महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Parents of PB Jog School Aggressive : पुण्यातील पी. बी. जोग शाळेतील विद्यार्थ्यांचे निकाल पाहून पालकांचा संताप - Jog School Students

पुण्यातील पी. बी. जोग शाळेचा ( P B Jog School ) सीबीएससीचा निकाल लागला आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल पाहून विद्यार्थ्यांचे पालक चक्रावले ( Parents of PB Jog School Aggressive )आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत याला शाळा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तसेच पालकांनी आंदोलनाचा पवित्रा ( Parents have Taken a Protest Stance ) घेतला आहे. आपले निकाल पाहून विद्यार्थीदेखील चक्रावले आहेत.

Parents of PB Jog School Aggressive
पी बी जोग शाळेतील पालक संतापले

By

Published : Jul 23, 2022, 2:53 PM IST

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यात दहावीचा निकाल ९४.४० टक्के, तर बारावीचा ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा दहावीचा निकाल ९७.४१ टक्के, तर बारावीचा निकाल ९०.४८ टक्के लागला आहे, असे असताना पुण्यातील पी. बी. जोग शाळेतील ( P B Jog School ) निकाल पाहून विद्यार्थी आणि पालक हे दोघेही चक्रावले आहेत. शाळेचा जो निकाल लागला आहे. त्यावर पालक आक्रमक झाले असून, पालकांनी ( Parents of PB Jog School Aggressive ) आंदोलनाचा पवित्रा घेतला ( Parents have Taken a Protest Stance ) आहे.

पी. बी. जोग शाळा

पालकांनी धरले शाळा प्रशासनास जबाबदार : पुण्यातील पी. बी. जोग शाळेतील टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ 60 ते 65 टक्के गुण मिळाले आहेत. काही विद्यार्थी तर एक ते दोन विषयांत नापासदेखील झाले आहेत. या सर्व निकालावर शाळाच जबाबदार असल्याचे सांगत सुमारे 100 हून अधिक पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.


शाळेविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा : शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता उशिरा मिळाली. पहिल्या सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण मिळाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल धक्कादायक लागले असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यच अडचणीत सापडले आहे. असा संताप पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शाळेच्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेण्याबाबतची दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात येत आहे.

हेही वाचा : Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'

ABOUT THE AUTHOR

...view details