Girl Commits Suicide: मालकिणीने लावला चोरीचा आरोप,17 वर्षीय तरुणीची आत्महत्या - कोंढवा पोलिस ठाणे
मालकिणीने काम करणाऱ्या मुलीवर (On the working girl) चप्पल आणि पर्स चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने त्या 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide of a young woman) धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Thane) या प्रकरणी घर मालक महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे:पायल बाबू चव्हाण (वय 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव असून याप्रकरणी घर मालक असलेल्या पल्लवी रितेश अग्रवाल (40) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या मुलीवर चोरीचा आरोप लवल्यानेच मुलीने आत्महत्या केली असल्याचे सांगत मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पायल ही काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामाला होती. परंतु पल्लवी यांनी पायल हिच्यावर पर्स आणि चप्पल चोरीचा आळ घेत तिला वारंवार त्रास द्यायची. सतत होणारा चोरीचा आळ आणि त्रास सहन न झाल्याने पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.