महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Osho Pune Ashram Controversy : पुण्यात ओशो भक्तांच्या गटाला प्रवेश नाकारल्याने वादंग - ओशो आश्रम पुणे

दुर्दैवाने ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या व्यवस्थापन आणि विश्वस्तांनी आम्हाला कोणतेही कारण किंवा अधिकृत पत्र न देता आवारात प्रवेश करण्यापासून रोखले असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. ओशो आश्रमात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

Osho Pune Ashram Controversy
Osho Pune Ashram Controversy

By

Published : Mar 22, 2022, 7:05 PM IST

पुणे - ओशो आश्रम आणि त्यावरून होणारे वाद हे काही आता नवीन नाही. कधी ओशो आश्रमाच्या जागेवरून तर कधी आश्रमाच्या भक्तांमध्येच वाद पाहायला मिळाला. मात्र, पुन्हा पुण्यातील ओशो आश्रमाचा वादंग समोर आला आहे.ओशोंच्या संबोधी दिनी त्यांच्या अनुयायांच्या एका गटाला आश्रमात प्रवेश नाकारल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.

ओशो भक्तांच्या गटाला प्रवेश नाकारल्याने वादंग
का झाला वाद
हा वाद मिटविण्यासाठी पुणे पोलिसांना ही बोलविण्यात आले आहे. मात्र, तरीही बराच वेळ वाद सुरूच होता. जोपर्यंत आत प्रवेश देणार नाही तो पर्यंत गेट समोरच बसून राहण्याचा भक्तांनी निर्णय घेतला आहे. ओशो शिष्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. या दिवशी शिष्य ध्यान करण्यासाठी आणि एकत्र उत्सव साजरा करण्यासा येतात. दुर्दैवाने ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या व्यवस्थापन आणि विश्वस्तांनी आम्हाला कोणतेही कारण किंवा अधिकृत पत्र न देता आवारात प्रवेश करण्यापासून रोखले असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


हजार कोटींचा काढला घोटाळा

तर काही फॉरेनर भक्तांनी केलेला हजारो कोटींचा घोटाळा आम्ही बाहेर काढला त्यांना कोर्टात खेचलं याचा राग मनात धरून आम्हाला आश्रमाच्या बाहेर अडवलं जात असल्याचा आरोप आश्रमाचे ट्रस्टी योगेश ठक्कर यांनी केला आहे.

हेही वाचा -डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही

ABOUT THE AUTHOR

...view details