महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MPSC Result : सुंदरी एस.बी बनली महाराष्ट्रातील पहिली अनाथ पोलीस उपनिरीक्षक

अनाथ असल्याने ज्या संस्थेत ती मोठी झाली त्या संस्थेच नावच सुंदरी आडनाव म्हणून लावते. सुंदरी संपर्क बालग्राम असे ती पूर्ण नाव लावते. आणि शेवटपर्यंत हेच नाव लावणार असल्याचे सुंदरी सांगते. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले. आणि वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अनाथ मुलं सुंदरी हिला मानखुर्द संस्थेत सोडलं जात.

Orphan girl Sundari SB became the first Sub-Inspector of Police in Maharashtra
महाराष्ट्रातील पहिली अनाथ पोलीस उपनिरीक्षक

By

Published : Mar 26, 2022, 12:05 PM IST

Updated : Mar 26, 2022, 1:01 PM IST

पुणे- दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल नुकताच लागला. बऱ्याच कालावधीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याचा आशेचा किरण दिसतोय. पण जिद्द, चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नांत अनाथ असलेली कॉम्पुटर इंजिनीयर सुंदरी एस.बी ही राज्यातील पहिली अनाथ मुलगी म्हणून पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत पास झाली आहे.

महाराष्ट्रातील पहिली अनाथ पोलीस उपनिरीक्षक

सुंदरी हेच आडनाव - सुंदरी एस.बी. या नावात एक अर्थ आहे. अनाथ असल्याने ज्या संस्थेत ती मोठी झाली त्या संस्थेच नावच सुंदरी आडनाव म्हणून लावते. सुंदरी संपर्क बालग्राम असे ती पूर्ण नाव लावते. आणि शेवटपर्यंत हेच नाव लावणार असल्याचे सुंदरी सांगते. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले. आणि वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी अनाथ मुलं सुंदरी हिला मानखुर्द संस्थेत सोडलं जात. आणि आपलं काही नाव, गाव माहिती नाही. म्हणून सुंदरी हे नाव आणि संस्थेचे नाव म्हणजेच आपले आडनाव असे घेऊन वयाच्या अठराव्या वर्षी उच्च शिक्षणासाठी २०१४ साली 'संपर्क बालग्राम' येथून सुंदरी बाहेर पडली. पुढील चारवर्ष नोकरी, शिक्षण, घरी रोज - पाच ते सहा स्पर्धा असं करत कॉम्पुटर इंजिनीयर होते. पुढे जाऊन लग्न झाले. मात्र पतीच्या पाठिंब्यामुळे तिने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. मुलगी अवघी सात महिन्यांची असताना तिला कुटुंबीयांकडे सोडून तिने मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.असं यावेळी सुंदरी सांगते.

जवळ केवळ 500 रूपये - हे सगळं घडत असताना ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आणि २०१९ साली मुंबईत ऐन पावसाळ्यात परीक्षेला जाते. जवळ अवघे ५०० रुपये असतात. त्यातच ती मुंबई पर्यंतचा प्रवास करते, शेवटच्या क्षणी केंद्रावर पोहचते आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. जिद्द चिकाटी आणि मेहनतच्या जोरावर तिने २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेमधून तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. प्रत्येक अनाथ मुलाच्या मनात आई-वडील नसल्याची खंत असते. मात्र, खचून न जाता आयुष्याची लढाई जिंकणे महत्त्वाचे असते. अनाथ म्हणून जगण्यापेक्षा एक माणूस म्हणून जागा हा आशेचा किरण आहे. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा असेल तर यशाला नक्कीच गवसणी घालता येते.असं देखील यावेळी सुंदरी म्हणाली.

Last Updated : Mar 26, 2022, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details