महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sushma Andhare : विरोधक बिथरले, सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर घाणाघात - Andhare taunted Shinde group

अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेने ( Shiv Sena in Andheri East elections ) उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) दिवंगत आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी ( Rutuja Latke Shiv Sena candidate ) दिली. मात्र, शिंदे सरकारच्या ढोंगीपणाबाबत अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

Sushma Andhare
सुषमा

By

Published : Oct 12, 2022, 6:32 PM IST

पुणे - अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेने ( Shiv Sena in Andheri East elections ) उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) दिवंगत आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी ( Rutuja Latke Shiv Sena candidate ) दिली. मात्र, त्यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुषमा अंधारे

विरोधक बिथरले :अशातच त्या स्वतः शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. यावर शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांना विचारलं असता ते म्हणाले की ऋतुजा ताई यांनी 10 ते 15 दिवस आधीच राजीनाम्याची मागणी केली आहे. दसरा मेळाव्याच्या वेळेस देखील बिएमसी ने जो राजकीय कांगोवा केला. राजकीय हस्तक्षेप हा केला हे जनतेसमोर आहे. तसेच राजकीय हस्तक्षेप हा आत्ता ऋतुजा लटके यांच्या बाबतीत करत आहे का अस प्रश्न उपस्थित होत? पण एक आहे की विरोधक हे आत्ता बऱ्या पैकी बिथरले आहे. अस यावेळी अंधारे यांनी सांगितल.

त्यांना वाटले आम्ही खचून जाऊ :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) विद्यार्थ्यांनी येथे पीएचडी धारक विद्यार्थ्यांच्या शुल्क वाढीचा विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज शिवसेना नेते सुषमा अंधारे पुण्यात आल्या होत्या. सुषमा अंधारे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमेक्री केली म्हणून गुन्हा दाखल ( A case has been registered against Sushma Andhare ) करण्यात आला आहे. यावर अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्याकी, महाप्रबोधन यात्रेचे उद्घाटन हे ज्या दिवशी झाले त्या दिवशी शिवसेना नाव, चिन्ह गोठवलले. त्यांना वाटलं की आम्ही खचून जाऊ परंतु आम्ही खचून न जाता लढत आहोत. मी माझ्या भाषणात एकही शब्द असंवैधानिक बोललेली नाही. तर मग राज ठाकरे हे तर किती नकला करतात. त्यांच्यावर का गुन्हे दाखल झाले नाही.असा सवाल त्यांनी यावेळी केला.

शिंदे गटाचा रडीचा डाव -निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या चिन्ह बाबत अंधारे यांना विचारलं असता ते म्हणाले की निवडणूक आयोगाने शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांना चिन्ह दाखवाव. सांगावं की तुला कोणतं चिन्ह पाहिजे. लहान मुलांसारखे चिन्ह त्यांनी निवडाव मग आम्हाला द्यावं. लहान मुलांसारखा डाव शिंदे गटाकडून सुरू होता. तुम्हाला जे चिन्ह ते आम्हालाच चिन्ह..असा रडीचा डाव त्यांचा होता. अशी टीका देखील यावेळी अंधारे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details