महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकतर्फी प्रेमातून गोळीबार, आरोपी अटकेत - कोल्हेवाडी एकतर्फी प्रेमातून गोळीबार

कोल्हेवाडी गावाजवळ एकतर्फी प्रेमातून कारमधून जाणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. हवेली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

एकतर्फी प्रेमातून गोळीबार, आरोपी अटकेत
एकतर्फी प्रेमातून गोळीबार, आरोपी अटकेत

By

Published : May 27, 2021, 7:32 PM IST

पुणे - अक्षय उर्फ रावण चंद्रकांत दुबे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बंदूक काढून फिर्यादी यांच्यावर रोखली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी हे कोल्हेवाडी येथील मुक्ताई हॉटेल येथे आले होते. यावेळी त्यांना त्या ठिकाणी अक्षय दुबे दिसला. त्यांनी त्याच्या जवळ जात आमच्या नातेवाईक महिलेला त्रास का देतोस अशी विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने त्याच्याकडे असलेली बंदूक काढून फिर्यादी यांच्यावर रोखली.

वाट अडवून गोळी झाडली
दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी कारमधून पोलीस ठाण्यात जात असताना आरोपीने किरकटवाडी येथे त्याची वाट अडवून त्याच्या दिशेने गोळी झाडली आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार एक तर्फी प्रेमातून घडला असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details