महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Crime News : पुणे पोलीस दल हदरलं, एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी - पुणे क्राईम न्यूज

पुणे शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी देत कट रचला आणि ही सुपारी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दिल्याने पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Pune
पुणे

By

Published : Jan 1, 2022, 7:29 PM IST

पुणे - शहरातील पोलीस दलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी देत कट रचला आणि ही सुपारी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दिल्याने पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण

या प्रकरणी अधिक माहिती अशी की पुणे पोलीस दलातील कर्मचारी नितीन दुधाळ व दिनेश दोरगे यांच्यात काही वैयक्तिक वाद आहेत. त्यातूनच हा कट रचला गेला असल्याचे सांगण्यात आले आहे. ते दोघे एकमेकांच्या शेजारी राहत होते. त्यापैकी नितीन दुधाळ हे सध्या फरासखाना पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत तर दिनेश दोरगे हे दत्तवाडी पोलीस स्टेशनला. यापैकी नितीन दुधाळ या कर्मचाऱ्याने दिनेश दोरगे याला मारण्याची सुपारी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला आणि सध्या पॅरोलवर असलेला गुन्हेगार योगेश प्रल्हाद अडसूळ याला दिली होती.

दरम्यान दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक सराईत गुन्हेगारांची माहिती घेत होते. तसेच, थर्टीफस्टनिमित्त पेट्रोलिंग करत असताना यावेळी पथकाने योगेश याला पकडले होते. त्याच्याकडे चौकशी केलीअसता त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आणि हा कट उघड झाला योगेश याच्या मोबाईलमध्ये याचे रेकॉर्डिंग पोलिसांना सापडले आहेत. त्यात हा खुनाचा कट रचल्याचे सर्व पुरावे सापडले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगाराला अटक -

याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद आडसूळ (वय 28, रा. दत्तवाडी) याला अटक केली असुन पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, कट रचणे यासह विविध कलमानव्ये दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी तक्रार दिली असून काल रात्री हा सारा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडसूळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो नुकताच पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला आहे. एका गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात देखील होता. आता या प्रकरणाचा आधीक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details