महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Paper Leak Case : आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील आणखीन एका आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटक - आरोग्य विभाग परीक्षा घोटाळा आरोपी अटक

आज सकाळीच आरोग्य विभागाच्या 'गट क' पेपर फुटी ( Health Department Paper Leak Case ) प्रकरणातील आणखीन एका आरोपीला ( Paper leak Scam Accused Arrest In Pune ) अटक केल्यानंर आता पुणे पोलीसांनी आरोग्य विभाग 'गट ड' ( Group D Exam ) परीक्षा पेपरफुटी संदर्भातील आणखीन एका आरोपीला अटक केली आहे.

Health Department Paper Leak Case
Health Department Paper Leak Case

By

Published : Feb 11, 2022, 4:48 AM IST

पुणे -गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीच प्रकरण ( Helth Department Exam Scam ) हे राज्यभर गाजत आहे. टीईटी ( TET ) पेपर फुटी प्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीच प्रकरण असेल, पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक करताना दिसत आहेत. आज सकाळीच आरोग्य विभागाच्या 'गट क' पेपर फुटी ( Health Department Paper Leak Case ) प्रकरणातील आणखीन एका आरोपीला ( Paper leak Scam Accused Arrest In Pune ) अटक केल्यानंर आता पुणे पोलीसांनी आरोग्य विभाग 'गट ड' ( Group D Exam ) परीक्षा पेपरफुटी संदर्भातील आणखीन एका आरोपीला अटक केली आहे.

आणखी एकाला अटक -

पुणे पोलिसांनी आज पेपर फुटी प्रकरणात आणखीन एका आरोपीला औरंगाबाद येथून अटक केली आहे. अर्जुन भरत राजपूत, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अर्जुन हा औरंगाबाद येथे म्हाडा परिक्षेकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तर आरोग्य विभाग गट क च्या पेपरफुटी प्रकरणात अतुल राख याला पोलिसांनी पुण्यात काल अटक केली होती.

दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी -

अर्जुन राजपूत या आरोपीला औरंगाबाद येथून अटक केल्यानंतर पुणे पोलीसांनी त्याला आज न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गट क पेपर फुटी प्रकरणातील आरोपी अतुल राख याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -Disabled Boys Garage Kolhapur : गतिमंद मुलांना घडवणारा कोल्हापुरातील 'अवलिया'; पाहा विशेष रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

...view details