महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉक्टर महिलेशी ऑनलाइन जवळीक साधून ब्लॅकमेल करणारा गजाआड - पुणे महिला डॉक्टर ब्लॅकमेलींग प्रकरण

ऑनलाइन पद्धतीने महिलांची फसवणूक आणि मानसिक छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते आहे. पुण्यात महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवून ब्लॅकमेल करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Cyber Crime
सायबर क्राईम

By

Published : Dec 10, 2020, 5:07 PM IST

पुणे -डेटिंग ॲपवर महिलांशी ओळख वाढवून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवून ब्लॅकमेल करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संदीप जगन्नाथ धर्मक (वय 28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पैशांसाठी करत होता ब्लॅकमेल -

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये एका डॉक्टर महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेची डेटिंग ॲपवर आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी ऑनलाइन चॅटिंग सुरू केली. या डॉक्टर महिलेचे काही नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याने मिळवले. त्या आधारे ब्लॅकमेल करत तिला पैशाची मागणी सुरू केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.

अनेक महिलांची केली फसवणूक -

त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपीने टिंडर व हिंज या ॲपवर नॉरमन व रेयान या नावाने फॉरेनर व्यक्तीचे फोटो लावून बनावट अकाऊंट तयार केले. यावर तो स्वतःला पुणे शहरात असणाऱ्या मसाज सेंटरचा मॅनेजर असल्याचे सांगून महिलांशी ऑनलाइन चॅटिंग करत होता. नंतर महिलांना विश्वासात घेऊन त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मागून घ्यायचा. नंतर हे व्हिडिओ आणि फोटो उघड करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही महिलांनी भीतीपोटी त्याला पैसेही दिलेले आहेत.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी लष्कर पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसात अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. या आरोपीने अशाप्रकारे आणखी कुणाला ब्लॅकमेल केले असल्यास त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्याक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस कर्मचारी समीर पटेल, तारु, चोरमोले यांनी ही कारवाई केली.

साताऱ्यातही झाली होती अशीच घटना -

गेल्या आठवड्यात साताऱ्यातील वाईमध्येही अशीच एक घटना झाली होती. फेसबुकवरील एका ३५ वर्षीय मैत्रिणीचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी एकाला अटक केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details