महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

illegal pistol and bullets : अवैध पिस्तुल अन् जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एकास अटक - नवले पुलाजवळील हॉटेल

अवैधरित्या गावठी पिस्तुल व जिंवत काडतुसे बाळगल्या ( illegal pistol and bullets ) प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास अटक ( One Arrested by Sinhgad Police ) केली. प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे (रा. चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जप्त केलेला मुद्देमाल
जप्त केलेला मुद्देमाल

By

Published : Dec 23, 2021, 7:21 PM IST

पुणे -अवैधरित्या गावठी पिस्तुल व जिंवत काडतुसे ( illegal pistol and bullets ) बाळगल्या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास अटक ( One Arrested by Sinhgad Police ) केली. प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे (रा. चिंचवड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की, नवले पुलाजवळील हॉटेल डेक्कन पवेलियन येथे एक व्यक्ती गावठी पिस्तुल घेऊन थांबला असल्याची महिती मंगळवारी (दि. 21) गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर गस्ती पथक त्याठिकाणी पोहोचले. पोलिसांना पाहताच प्रशांतने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडला. पोलिसांनी त्याची झडती घेत चौकशी केली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंस काडतुसे आढळली. प्रशांतविरोधात खून व खूनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे पिंपरी-चिंचवड येथे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एक दिवसाची कोठडी त्यानंतर जामीन

बुधवारी (दि. 22 ) सिंहगड पोलिसांनी प्रशांतला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपीने जामीन अर्ज केला असल्याने कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर केला, अशी माहिती सिंहगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबले यांनी दिली.

हे ही वाचा -Maharashtra TET Corruption: कोण आहे सौरभ त्रिपाठी... कसं पकडलं पुणे पोलिसांनी... पहा ही बातमी

ABOUT THE AUTHOR

...view details