पुणे-कोरोना संकटात देशातील धार्मिकस्थळे, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली असली तरी देवतांचे धार्मिक विधी हे नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. सध्या दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिरात दिवळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, शिवलिंगाभोवती रांगोळी, विविध रंगांच्या फुलांनी सजावट करण्याता आली आहे. या सर्वांमुळे मदिर परिसर उठून दिसत आहे.
देऊळ बंद तरी परंपरा जपल्या....
भिमाशंकर मंदिर गेल्या सात महिन्यांपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असले, तरी भिमाशंकर शिवलिंगाची आरती, पूजा नित्यनियमाने सुरू आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव शासकीय नियमांचे पालन करून परंपरेप्रमाणे भिमाशंकर मंदिरात पार पाडले जातात. या पार्श्वभूमीवर दिपावलीच्या सुरुवातीला संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढण्यात आले. प्रत्येक दिवशी गाभाऱ्यात व सभामंडपात रंगोळी काढण्यात आली व गाभाऱ्याला विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले.
लक्ष्मीपूजन निमित्त शिवलिंगाला फुलांचा शृंगार...