पुणे : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया.अक्षय तृतीयेचे महत्व म्हणजे, बारा महिन्यातली ही अशी तृतीया असते ज्यात ही संपूर्ण तृतीया मानली जाते. या तृतीयेमध्ये चतुर्थीचा समावेश नसतो. म्हणूनच ही अक्षय तृतीया मानली जाते. या दिवशी खरेदी देखील मोठ्या प्रमाणत केली जाते .
मागच्या वर्षी होत कोरोनाच संकट : याच दिवसाचं औचित्य साधत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये नागरिकांनी आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत ( Big rush to buy mango in Pune ) आहे. पुण्यातील या बाजारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी ( purchase mangoes for Akshayatritiya ) असते. मात्र मागच्या दोन वर्षांत कोरोनाच्या सावटामुळे गतवर्षी आंब्याची विक्री देखील म्हणावी तशी झाली नव्हती.