पुणे -पुणे शहरातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करता येणार आहे, मात्र त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीच्या दिवशी ओंकारेश्वर मंदिर बंद - Pune News Update
पुणे शहरातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करता येणार आहे, मात्र त्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी सांगितले आहे.
खबरदारी म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय
राज्याबरोबर पुणे शहरात करोना संसर्ग वाढत असून, दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला ओंकारेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, खबरदारी म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.