पुणे -पुणे शहरामध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.ओमिक्रॉन कोरोना विषाणूंचा ( Omicron Corona new Variant) धोका लक्षात घेता. महापालिका प्रशासन सतर्क झाले असून तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. मात्र या तरुणाला कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, याबाबतचा अहवाल येणे बाकी आहे.
पुणे शहरामध्ये दक्षिण आफ्रिकेमधील झांबिया या देशातून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. ओमिक्रॉन कोरोना विषाणूंचा धोका लक्षात घेता. महापालिका प्रशासन सतर्क झाले असून तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. मात्र या तरुणाला कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनची लागण झाली आहे, का या बाबतचा अहवाल येणे बाकी आहे. त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
60 वर्षीय हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील झांबिया या देशातून 20 नोव्हेंबर रोजी मुंबईत आला व टॅक्सीने पुण्याला आला. प्रशासनाने संबंधित टॅक्सी ड्रायव्हर व त्यांच्या कुटूंबीयांची कोरोना चाचणी केली असता सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पुणेकरांची धाकधूक वाढली -
कोरोनाच्या नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा ( Omicron Corona new Variant) धोका लक्षात घेता. केंद्र सरकारने राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच कोरोनाकाळात सर्वाधिक संसर्गबाधित असलेल्या पुणे शहरात आता दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे.
अद्याप तपासणी अहवाल येणे बाकी -
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दक्षिण अफ्रिकेतून पुण्यामध्ये एक प्रवाशी दाखल झाला असून त्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहेत. पण अद्याप या व्यक्तीचा तपासणी अहवाल समोर आलेला नाही. कुटुंबातील चौघेजण हे परदेशात फिरायला गेले होते आणि त्यापैकी एका व्यक्तीचा कोविड लक्षण आढळून आली आहेत. एकाचा कोविडची लक्षण आढल्याने इतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर लक्षण आढळून आलेल्या तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून तातडीने या प्रवाशाची ओमिक्रॉनची चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.