महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Punjab National Bank : खात्यात किमान शिल्लक रक्कमपेक्षा दुप्पट ठेवायचे बंधन; ग्राहकांची फसवणूक - pnb service tax percentage

पंजाब नॅशनल बँकेने १५ जानेवारी पासून ग्राहकराजाला सेवाशुल्कात २५-५० टक्के वाढ केली आहे. मात्र, मोठ्या शहरांमध्ये खात्यात किमान शिल्लक रक्कम दुप्पट ठेवण्याचे बंधन घातले आहे. पुणे - मुंबई यासारख्या मोठ्या शहरात खात्यात किमान दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. आणि तसे न केल्यास ६०० रुपये दंड ठोठावला जाईल.

Punjab National Bank
Punjab National Bank

By

Published : Jan 11, 2022, 6:11 PM IST

पुणे :- एकीकडे देशात बँकेचे खाजगीकरण आणि विश्वासार्हता याबाबत सातत्याने प्रश्न चिन्हे उपस्थित केले जात आहे. काही बँकांकडून ग्राहकराजाच्या खिशावर बेकायदेशीर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार पंजाब नॅशनल बँकेच्या बाबतीत देखील समोर आला आहे.

विवेक वेलणकर प्रतिक्रिया

माहिती अधिकारात माहिती घेतली असता, पंजाब नॅशनल बँकेने १५ जानेवारी पासून ग्राहकराजाला सेवाशुल्कात २५-५० टक्के वाढ केली आहे. मात्र, मोठ्या शहरांमध्ये खात्यात किमान शिल्लक रक्कम दुप्पट ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे पुणे - मुंबई यासारख्या मोठ्या शहरात खात्यात किमान दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. आणि तसे न केल्यास ६०० रुपये दंड ठोठावला जाईल.

बँकेकडून 10 % हून कमी वसुली
मोठ्या कर्जदारांची थकीत कर्जे वसूल करण्यात सपशेल अपयश आलेली बॅंक आता ज्या ग्राहकराजाच्या जिवावर बॅंक चालते त्यांच्या खिशात हात घालून दात कोरून पोट भरायला बघत आहे. माहिती अधिकारात बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ ते २०२०-२१ या फक्त पाच वर्षांत पंजाब नॅशनल बँकेने १०० कोटींच्या वर कर्ज थकबाकी असणाऱ्या 148 थकबाकीदारांची 46125 कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली आहेत. त्यातील फक्त 4516 ( 10 % हून कमी) कोटी रुपयांची वसुली बॅंक करु शकली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी दिली आहे.
हेही वाचा -Anil Deshmukh Bail Application : अनिल देशमुख यांना जेल की बेल? आज मुंबई सत्र न्यायालयात फैसला

ABOUT THE AUTHOR

...view details