पुणे :आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी ओबीसी समाजाने पुण्यात मोर्चाचे आयोजन केले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे, आंदोलकांची धरपकड करण्यात आली. यानंतर आता दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे घोषित केले गेले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका केली आहे.
ओबीसी मोर्चा : आंदोलन स्थगित, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची पोलिसांनी केली सुटका.. - ओबीसी पुणे मोर्चा
13:20 December 03
ओबीसी मोर्चा : आंदोलन स्थगित, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची पोलिसांनी केली सुटका..
12:24 December 03
समीर भुजबळ यांना फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
12:05 December 03
समीर भुजबळांसह सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात..
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यामुळे सर्व आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. यामध्ये माजी खासदार समीर भुजबळांचाही समावेश आहे.
11:49 December 03
राष्ट्रवादी काँग्रेस नेते समीर भुजबळही उपस्थित..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळही या मोर्चामध्ये उपस्थित आहेत.
11:48 December 03
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर मोर्चात सहभागी..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यादेखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.
11:44 December 03
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा..
पुणे :ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी मोर्चा नेण्यावर आंदोलक ठाम आहेत. यासाठी शेकडोंच्या संख्येने आंदोलक शनिवारवाड्याबाहेर जमले आहेत.