पुणे -कोरोनाच्या या कठीण काळात एकीकडे आरोग्य कर्मचारी रुग्णालयात जास्तीत जास्त कसे टिकवून ठेवता येईल, यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र खासगी रुग्णालयांचा मुजोरपणा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे पुण्यातील जहांगीर रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफला अक्षरशः रस्त्यावर उतरावे लागले आहे. जर योग्य निर्णय घेतला नाही, तर सामुहिक राजीनामा देण्याच्या इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहेत.
...म्हणून पुण्यातील जहांगीर रुग्णालयाचा 'नर्सिंग स्टाफ' रस्त्यावर, सामूहिक राजीनाम्याचा दिला इशारा - jehangir hospital agitation news
मागील चार महिन्यांपासून कमी पगार देत 12-12 तास राबवून घेत असल्याचा आरोप जहांगीर रुग्णालयातील नर्सिंग स्टाफने केला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून हॉस्टेलमध्ये येऊन धमक्या व शिवीगाळ केले जात असल्याचाही आरोप स्टाफने केला आहे. यामुळे नर्सिंग स्टाफने जहांगीर रुग्णालयासमोर आंदोलन केले असून यावर योग्य निर्णय न झाल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराही करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासन मागील चार महिन्यांपासून अन्याय करत असून होस्टेलवर येऊन धमक्या देत आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप नर्सिंग स्टाफ करत आहे. जवळपास तीनशेहून अधिक नर्सिंग स्टाफ रुग्णालयासमोरील आंदोलनात सहभागी झाले होते. चार महिन्यांपासून जहांगीर रुग्णालय प्रशासन अन्याय करत असल्याने नर्सिंग स्टाफला पगार कमी देणे. कुलिंग टाईम नाही, 12-12 तास काम कराण्याची सक्ती, अशा अनेक त्रास या नर्सिंग स्टाफला दिला जात आल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.
जहांगीर रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड विभाग आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता आम्ही कोविड सेंटरमध्ये काम करत आहोत. तरीही आम्हला पगार कमी देणे. आमच्याकडून जास्त काम करून घेणे. रुग्णालय प्रशासन हॉस्टेलवर येऊन आम्हला धमक्या देणे, असा अन्याय गेल्या चार महिन्यांपासून करत आहे. येत्या 24 तासांच्या आत योग्य निर्णय न घेतल्यास सामुहिक राजीनामा देऊ, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.