पुणे - पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ( Malnutrition affected children in Pune ) प्रयत्न होत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले असून, जिल्ह्यात तीव्र कुपोषित ( Malnutrition affected children in Pune district decreased ) मुलांच्या संख्येमध्ये ७८ टक्के, तर मध्यम कुपोषित ( Malnutrition pune ) मुलांच्या संख्येत ६८ टक्क्यांनी घट झाली आहे.
हेही वाचा -Sidhu Musewala Murder Case : संतोष जाधवची आई म्हणते,'...तर मी मुलाला पाठिशी घालणार नाही'
० ते ६ वर्षे वयोगटात तब्बल ३ लाख २८ हजार मुलांची तपासणी -जिल्हा परिषदेतर्फे एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्थ रँकिंग सिस्टीम असे त्याचे नाव असून या द्वारे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील ० ते ६ वर्षे वयोगटातील तब्बल ३ लाख २८ हजार मुलांच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आली असून, यातील 1 हजार 403 मुले ही कुपोषित आढळून आली होती. यातील 238 मुले ही अतितीव्र कुपोषित होती, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
तीन महिन्यात 70 टक्क्यांहून अधिक मुले कुपोषणातून बाहेर - कुपोषणात जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि इंदापूर या तालुक्यांमधील मुलांचा अधिक सहभाग होता. या कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी बालविकास केंद्र, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्या मार्फत नियंत्रण ठेवून त्यांच्यावर पोषण आहार आणि मेडिकल ट्रिटमेंटसाठी स्थानिक आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जे आवश्यक असेल ते मेडिकल ट्रिटमेंट तसेच मल्टी व्हिटॅमिन सिरप उपलब्ध करून दिले. त्यातूनच तीन महिन्यांत 70 टक्क्यांहून अधिक मुले ही कुपोषणातून बाहेर आली आहेत, असे गिरासे यांनी सांगितले.
मुलांना आठ वेळा देण्यात येत आहार -या मुलांना आहाराची एक पातळी ठरवून देण्यात आली होती. प्रत्येक बालकाला दिवसातून आठ वेळा कसा आहार देण्यात यावा आणि त्यामध्ये ड्रायफ्रुड तसेच इतर पदार्थ कसे देण्यात यावे याच्या सूचना तालुका स्तरावर देण्यात आल्या होत्या. आणि विशेषत: यात लोकसहभाग तसेच स्थानिकांची आणि इतर लोकांची मदत मिळाली. तसेच, या बालकांना दरोरोज मल्टिव्हिटॅमिन सीरप दोन वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जात होते, अस देखील गिरासे यांनी सांगितले.
अजूनही 414 मूल कुपोषित -जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी मुले कुपोषणातून बाहेर आली आहेत, त्यांच्यावर नियंत्रण आहेतच, पण ज्या मुलांच्या वजनात अजूनही वाढ झालेली नाही. तो आकडा 414 असून त्या मुलांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र जे पुण्यातील औंध या ठिकाणी असून तेथे या मुलांवर उपचार केला जाणार आहे आणि त्यांना विविध उपचार, तसेच पोषण देऊन त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, अस गिरासे यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यात अजून 300 मुले कुपोषित -कुपोषण तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे निकष लावले असून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करतात. तसेच, अशी मुले डॉक्टरांकडे गेल्यास त्यांच्या तपासणीतून ते कुपोषित असल्याचे कळते. मात्र, पुणे जिल्ह्यात या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासणी केली जाते. ही तपासणी सखोल होत असून या माध्यमातून कुपोषित बालक कोणकोणती आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले पाहिजे, हे कळते. आणि ही तपासणी दर तिमाहीला करण्यात येते. याचा दुसरा टप्पा देखील सुरू झाला असून 70 टक्के काम झाले आहे. या नवीन तपासणीत अजून 300 मुले ही कुपोषित सापडली आहे, असे देखील गिरासे यांनी सांगितले.
४५० मुलांवर शस्त्रक्रिया -जिल्ह्यातील सर्व मुलांचे डिजिटल हेल्थ कार्ड व आयडी तयार केले आहे. अशी मुले सरकारी किंवा खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यास या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांचा आरोग्य इतिहास कळतो. यासाठी एक चार्टही तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक मुलाची ३६ वेगवेगळ्या बाबींसाठी तपासणी केली जाते. त्यात त्यांचे कुपोषणाचे प्रमाण व आरोग्याची स्थिती कळते. तसेच १६ प्रकारच्या सर्वसाधारण आजारांविषयी माहितीही कळते. त्यात त्वचा, डोळे, मेंदू, डोके यांचे आजार व त्याच्या विकृती तपासल्या जातात. गेल्या तपासणीत शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अशा सुमारे ४५० हून अधिक मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा -MNS Pune : वसंत मोरेंच्या 'त्या' खंद्या शिलेदाराने केला मनसेला 'जय महाराष्ट्र'!