पुणे - फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, ओळख वाढवून नंतर ऑनलाईन सेक्सची ऑफर देत ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे 150 तक्रार अर्ज आले आहेत.
- पुणे पोलिसात तक्रार दाखल
कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. अशावेळी काम करत असताना अनेकजण मनोरंजनासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर काही वेळ घालवतात. अशावेळी एक अनोळखी तरुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर ओळख वाढवून त्यांच्यासोबत चॅटिंग केली जाते. विश्वास संपादन केल्यानंतर ऑनलाईन सेक्सची ऑफर देऊन संबंधित व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. काही जण त्यांच्या या जाळ्यात फसतात. त्यानंतर ऑनलाईन सेक्सचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळली जाते.
हेही वाचा -दोघी मैत्रिणींचा विहिरीत बुडून मृत्यू; दिंडोरीच्या सावरपावडा येथील घटना