पुणे - कोरोना महामारीमध्ये कधीकाळी पुणे हे हॉटस्पॉट ठरले होते. आता देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुण्यातही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. विशेष म्हणजे, आज(20 ऑक्टोबर) पुण्यात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
- दिवसभरात 112 कीरोनाबाधित रुग्ण -
ऑगस्ट महिन्यामध्ये तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपवण्यात प्रशासनाला यश आले असेच दिसत आहे. पुणे शहरात आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे पुण्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांच्या खाली देखील आली आहे.
हेही वाचा -Cruise Drug Case : जामिनासाठी आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी