पुणेपावसाळ्यात रस्ते आणि खड्डे याचे समीकरण हे गणितातल्या सूत्रासारखेच असते पाऊस आला की खड्डे पडणार पण खड्डे नसणारे रस्तेही भारतात तयार होतात आणि ते 46 वर्ष टिकतात हे एक आश्चर्य आहे 46 वर्षांमध्ये एकही खड्डा न पडलेला आणि 46 वर्षांमध्ये एकही खिळा त्या रस्त्यावर न मारलेला असा एक रस्ता जंगली महाराज रोड पुणे येथे आहे जंगली महाराज रोड ते बालगंधर्व चौक डेक्कनपर्यंत हा रस्ता 46 वर्ष झाले या रस्त्यामध्ये एकही खड्डा नाही आणि इतर रस्ते जेवढे वाहनाचा भार घेतात तेवढ्याच भार हा रस्ताही घेतो
1973 ला महाराष्ट्रसह पुण्यातील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पुण्यामधील रस्त्याची दुरावस्था झाली. त्याचवेळी हा रस्ता करण्याचे तत्कालीन महानगरपालिकेचे पदाधिकाऱ्याने ठरवले. पावसामुळे सगळेच रस्ते बिकट अवस्थेत असताना त्यावेळेसचे स्थायी समितीचे सभापती श्रीकांत शिरोळे असे सांगतात की आमच्या असे ठरलेले होते की रस्ता तर बनवायचा पण मुंबईपेक्षा कमी पाऊस पडतो पण मुंबईतले रस्ते चांगले आहेत, अशी कंपनी शोधायची जी रस्त्याची खात्री देईल आणि रस्ता चांगला होईल. आज काल रस्त्याचे काम करत असताना कंत्राटदार सरकारला अटी घालतात. परंतु पारशी बंधूंची एक कंत्राटदार कंपनी होती. पारशी दोन बंधू असणारे रिकाडो नावाची एक कंपनी होती. ज्या कंपनीने हा रस्ता बनवताना महानगरपालिकेलाच अटी घातल्या. त्या आठवणी त्यांनी सांगितले की या रस्त्यावर तुम्ही दहा वर्षे एकही खिळा मारायचे नाही. मंडप टाकायचे नाही आणि विना टेंडर काम द्यायचे आणि त्या पद्धतीने ते काम दिले गेले. तो रस्ता 46 वर्ष झाला आजही त्याच स्थितीत आहे.