पुणे -पुणेकरांसाठी आज एक अतिशय दिलासादायक बातमी आहे 15 एप्रिल 2020 नंतर आज प्रथमच पुणे शहरात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून आत्तापर्यंत दरोरोज पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होता. तब्बल 9 महिन्यानंतर आज प्रथमच एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पुणेकरांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे.
दिलासादायक! पुण्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही - corona update pune
पुणेकरांसाठी आज एक अतिशय दिलासादायक बातमी आहे 15 एप्रिल 2020 नंतर आज प्रथमच पुणे शहरात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
कोरोना
राज्यात सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण पुणे शहरात आढळला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात होते. दरोरोज किमान 4 ते 5 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत होते. आत्ता पर्यंत पुणे शहरात 4774 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या या काळात पहिल्यांदाच आज एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू न झाल्याने प्रशासनाने सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे टीमचे आभार व्यक्त केले आहे.
आत्ता पर्यंत 192982 पॉझिटिव्ह रुग्णसंख्या-
पुणे शहरात आत्तापर्यंत 192982 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून तर 186801 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या पुणे शहरात 1407 कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. 112 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि 212 रुग्ण ऑक्ससिजन वर उपचार घेत आहे.