महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आपण विस्तारवादी नाही, देशाला विज्ञानावर आधारित प्रगती साधायची आहे' - Nitin Gadkari on Atmnirbhar Bharat Abhiyan news

नितीन गडकरी म्हणाले, की शैक्षणिक संस्थांतून दर्जेदार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. जगभरात नावलौकिक कमावतात. शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण होत असताना शिक्षण सर्वांपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा गुणवत्ता राखणेदेखील तितकेच महत्वाचे आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी मांडले.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

By

Published : Nov 17, 2020, 3:55 PM IST

Updated : Nov 17, 2020, 4:41 PM IST

पुणे-आपल्या देशाची प्रगती करत असताना आपल्याला विज्ञानावर आधारित प्रगती करायची आहे. ज्ञान विज्ञानावर पुढे जायचे आहे. भारत हा विस्तारवादी देश नाही. काही देशांच्या मनात विस्तारवादाची भावना आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, की शैक्षणिक संस्थांतून दर्जेदार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. जगभरात नावलौकिक कमावतात. शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण होत असताना शिक्षण सर्वांपर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा गुणवत्ता राखणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी मांडले.

शिक्षणाचा गुणवत्ता राखणेदेखील तितकेच महत्त्वाचे


आयात आणि निर्यात वाढविली पाहिजे-
आत्मनिर्भर भारत बनवत असताना आयात कमी केली पाहिजे. निर्यात वाढविली पाहिजे, असेदेखील गडकरी म्हणाले.

शिक्षणाचे बाजारीकरण करणारे विस्तारित झाले-
शिक्षण क्षेत्रात चांगल्या भावनेने निस्पृहपणे काम करणारे लोक मागे पडले आहेत. शिक्षणाचे व्यवसायीकरण केलेल्यांचा खूप विस्तार झाला आहे. आपला देश जगातील सर्वात मोठी महाशक्ती करायचा असेल व्हिजन बाळगले पाहिजे. त्याचा विचार करून पुढे गेले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करायचे असेल तर शालेय शिक्षणापासून महाविद्यालयिन शिक्षणापर्यत शिक्षणाचे संवर्धन झाले पाहिजे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते.

Last Updated : Nov 17, 2020, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details