पुणे - केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी Union Road and Transport Minister Nitin Gadkari हे नेहेमी आपल्या कामातून ओळखले जातात. आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुरत, नाशिक, अहमदनगर नवीन हायवे Nashik Ahmednagar New Highway करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हायवेवर होणारी वाहतूक कोंडी, पुणे, मुंबई शहरात होणार प्रदुषण Pollution reduce In Pune, Mumbai कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे आत्ता या नवीन हायवेमुळे पुणे बेंगलोर प्रवास साडे तीन तासात करण्याचा मानस असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यात लॉजिस्टिक पार्क -केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील वाहतूकचा प्रश्न सोडवण्यासाठी आज बैठक बोलवली. तसेच यावेळी पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा देखील घेतला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता, तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्यासाठी विचार चालू असल्याचं यावेळी गडकरी म्हणाले. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने, मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करण्याची विनंंती त्यांनी केली. पुणे विभागात एनएचएआयच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी मनपाने जागा दिली तर, दोन लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचं देखील गडकरी यांनी सांगितले.