महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Reena Verma : 90 वर्षीय आजींची 75 वर्षांनी रावळपिंडीतील घराला भेट; पाकिस्तानमध्ये जल्लोषात स्वागत - रीना वर्मा पाकिस्तान मराठी बातमी

भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी रावळपिंडे येथून रीना वर्मा या भारतात आल्या होत्या. त्या आता तब्बल 75 वर्षानंतर पाकिस्तानातील आपल्या घरी जाणार ( Reena Verma Visit Home In Rawalpindi ) आहेत. पाकिस्तानने रीना वर्मा यांचा व्हिसा मंजूर केला आहे.

Reena Verma
Reena Verma

By

Published : Jul 24, 2022, 4:57 PM IST

पुणे - 90 वर्षीय रीना वर्मा ( Reena Verma in Pakistan ) हिची पाकिस्तानातील तिच्या घराला भेट देण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या ( India Pakistan partition ) वेळी ती पाकिस्तानातील रावळपिंडी ( Reena Verma Visit Home In Rawalpindi ) येथील वडिलोपार्जित घर सोडून भारतात आली होती. अखेर 75 वर्षानंतर तिचे स्वगृही परतण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पाकिस्तानने भारतीय नागरिक रीना वर्मा यांना व्हिसा ( Visa for Pakistan ) मंजूर केला आणि त्या वाघा अटारी सीमेवरून शनिवारी पाकिस्तानात पोहोचल्या. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात ( Reena Verma welcomed from Pakistan ) आले.

बालपणीच्या मित्र-मैत्रिणींना भेटणार - रीना वर्मा या रावळपिंडीला जाऊन आपल्या पूर्वजांचे घर 'प्रेम निवास', त्यांची शाळा आणि शाळेतील मित्र-मैत्रिणींना भेटणार आहेत. वर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला असून, त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.

घर पाहण्याची तळमळ - फाळणी झाली त्यावेळी वर्मा यांचे कुटुंब रावळपिंडीतील देवी कॉलेज रस्ता येथे राहत होते. वर्मा आणि त्यांच्या चार सख्ख्या भावंडांनी मॉडर्न स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आहे. फाळणीच्या वेळी रीना वर्मा यांचे वय 15 होते. रावळपिंडीतील आपल्या घराला भेट देता येणार असल्याने रीना आजी आनंदात आहेत. आता आमच्या घरात कोण राहत आहे, हे मला माहीत नाही. पण मला आशा आहे की, मला ते घर पाहू देतील असे आजींनी सांगितले आहे.

हीना रब्बानींकडून सहकार्य -रीना वर्मा यांनी 1965 मध्ये पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता. परंतु, युद्धामुळे दोन्ही देशांमधील तणावामुळे त्यांना व्हिसा नाकारण्यात आला. त्यांनतर गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्याची इच्छा रीना वर्मा यांनी व्यक्त केली. त्यांनी पुन्हा पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला, पण तो परत फेटाळण्यात आला. परतच्या वेळी वर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांना टॅग करत आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या व्हिसाची व्यवस्था करून दिली. आता ते पाकिस्तान येथे जाऊन त्यांचे वडिलोपार्जित घर बघणार आहे.

हेही वाचा -Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार

ABOUT THE AUTHOR

...view details