महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक 1147 नवीन रुग्ण; 19 रुग्णांचा मृत्यू - कोरोना वायरस केसेस पुणे

पुणे शहरात एकूण कोरोनाची बाधा झालेले 24 हजार 168 रुग्ण सापडले.14 हजार 998 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे झालेल्या मृत्यूची 770 वर पोहोचली.

Pune corona update
पुणे कोरोना अपडेट

By

Published : Jul 9, 2020, 7:12 AM IST

पुणे-पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 1 हजार 147 नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसातला हा कोरोना रुग्ण वाढण्याचा सर्वाधिक आकडा आहे. बुधवारी 19 जणांचा मृत्यू झाला. पुुण्यात आतापर्यंत आतापर्यंत कोरोनामुळे 770 नागरिकांचा मृत्यू झालाय.

आजपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रात एकूण कोरोनाची बाधा झालेले 24 हजार 168 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 14 हजार 998 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात बऱ्या झालेल्या 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 8 हजार 400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 401 रुग्ण गंभीर असून यातील 79 जण व्हेंटिलेटरवर आहेत

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 24 हजारावर जाऊन पोहोचलाय त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत चाललीय. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details