पुणे- जिल्ह्यासाठी गुरुवार घातवार ठरला आहे. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून नऊ जणांचा मृत्यू ( Nine people drowned in two separate incidents ) झाला आहे. मृतात चार सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. भोर गावातील भाटघर धारणामध्ये काल दुपारच्या सुमारास पाच विवाहित महिला पोहोण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या पाच मृतांमध्ये चार सख्या बहिणी आहे आणि एक त्यांची वहिनी आहे. या सर्व जणींचे मृतदेह रात्री उशिरा सापडले. पोलिसांना याची माहिती दिली.
पहिल्या घटनेमध्ये चासकमान धरण (ता. खेड) या ठिकाणी कृष्णमुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कुलमध्ये ( School of Krishnamurti Foundation ) शिकणाऱ्या ४ विद्यार्थ्याचा चासकमान धरणात पोहताना बुडुन मृत्यू ( 4 students drowned in Chaskaman Dam ) झाला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे रितीन डीडी, कु. नव्या भोसले, परिक्षित आगरवाल, कु. तनिष्का देसाई अशी नावे आहेत.
भाटघर धरणात महिलांचा बुडून मृत्यू दुसऱ्या घटनेत भाटघर धरण याठिकाणी नन्हे गाव येथे लग्नाला आलेल्या मुलींचा भाटघर धरणात बुडुन ( 5 women drawn in Bhatghar dam ) मृत्यू झालेला आहे. यामध्ये खुशबू लंकेश रजपूत, वय १९ वर्षे, रा.बावधान, मनीषा लखन रजपूत, वय २० वर्षे, चांदणी शक्ती रजपूत, वय २१ वर्षे, पूनम संदीप रजपूत, वय २२ वर्षे, तिघी रा. संतोषनगर हडपसर पुणे, मोनिका रोहित चव्हाण, वय २३ वर्षे, रा. नन्हे अशा महिलांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. ४ महिलांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम चालु आहे. या दोन्ही घटनांची माहिती मिळाताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, यांच्यासह विरीष्ठ अधिकारी तात्काळ रवाना झाले आहेत. शोधकार्य तातडीने सुरू आहे.
भोर गावातील भाटघर धारणामध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास पाच विवाहित महिला पोहोण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार महिलांचा मृतदेह सापडला आहे. यामध्ये चार सख्या बहिणी आहेत.