पुणे - पूरग्रस्त भागात शासनाकडून धान्य पाठवले जात आहे. अशा वेळी तहसीलदारांनी स्वःतच्या पाठीवर धान्याची पोती वाहिली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचबरोबर शासन पातळीवर ही मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे.
पदाचे जोडे बाजूला ठेवून नायब तहसीलदार वाहतोय पूरग्रस्तांसाठी पोती - आदर्श निर्माण करून दिला
पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिमंडळ अ या धान्य कोठारामधून पूरग्रस्तांना धान्याची पोती रात्री रवाना करण्यात आली. मात्र, पोती उचलण्यासाठी माणसांची वाट न पाहता पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी कर्मचाऱ्यांत एक नवीन आदर्श निर्माण करून दिला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिमंडळ अ या धान्य कोठारामधून पूरग्रस्तांना धान्याची पोती रात्री रवाना करण्यात आली. मात्र, पोती उचलण्यासाठी माणसांची वाट न पाहता पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी कर्मचाऱ्यांत एक नवीन आदर्श निर्माण करून दिला आहे. अनेक शासकीय अधिकारी असे आहेत जे त्यांच्या हाता खालील कर्मचाऱ्याकडून आपल्या घरच्या कामासह इतर कामे करून घेतात. पण निगडी येथील नायब तहसीलदारांनी पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली नाही आणि स्वतः धान्याची पोती खांद्यावरून वाहून इतर कर्मचार्यांना मदत केली. या अधिकाऱ्याने आपल्या खुर्ची चे जोडे बाजूला ठेऊन माणूसकी चं दर्शन घडवले आहे. बोटावर मोजण्याइतके अधिकारी क्वचित आढळतात. त्यातील एक म्हणजे नायब तहसीलदार असे म्हणावे लागेल.