महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Russia-Ukraine Crisis : युक्रेनमधून 20 वर्षाची निधी मायदेशी परतली, ETV BHARAT स्पेशल रिपोर्ट - युक्रेनमधून विद्यार्थी भारतात परतले

युक्रेनमधील भयावह परिस्थिती ( Russia Ukraine War ) आपण पाहत आहोत. गेल्या पाच दिवसाच्या प्रवासानंतर निधी आपल्या घरी ( Indian students return from Ukraine ) आली आहे. काय तिचा तो पाच दिवसाचा अनुभव होता. युक्रेनमधील सद्य परिस्थिती नेमकी कशी आहे, हे सगळ जाणून घेण्यासाठी निधीशी आणि तिच्या कुटुंबाशी बातचीत केलीय आमचे पुण्याचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी.

Nidhi Jagtap
निधी जगताप

By

Published : Feb 28, 2022, 8:46 AM IST

Updated : Feb 28, 2022, 10:14 AM IST

पुणे -मागील पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ( Russia Ukraine War ) काही नमण्याचे नाव घेत नाही. या युद्धामुळे अनेकजण युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारतातील देखील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सरकार विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आजअनेक विद्यार्थी आपल्या मायदेशी ( Indian students return from Ukraine ) परतले आहेत. त्यातलीच एक विद्यार्थिनी अवघ्या वीस वर्षाची निधी जगताप जी युक्रेनमध्ये मेडिकल स्टूडेंट आहे. ती देखील नुकतीच पुण्यात पोहोचली आहे.

ETV BHARAT स्पेशल रिपोर्ट
कुटुंबीयांना आश्रु अनावर -निधीला आपल्या घरी येऊन खूप आनंद झाल्याचं तीन सांगितले. निधीच्या आई बाबांना देखील अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर निधी जशी घरी आली तसेच इतर विद्यार्थ्यांना देखील मायदेशी परत घेऊन या अशी विनंती सरकारकडे केली आहे. युक्रेनमधील भयावह परिस्थिती आपण पाहत आहोत. गेल्या पाच दिवसाच्या प्रवासानंतर निधी आपल्या घरी आली आहे. हेही वाचा - Mann Ki Baat : 'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या
Last Updated : Feb 28, 2022, 10:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details