पुणे - राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. (NIA raids in Pune) दरम्यान, इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता तल्हा खानच्या घरी दिल्लीहून एनआयएचे अधिकारी हे आले होते. तब्बल 8 तास तल्हा खानची चौकशी करण्यात आली. या चौकशीत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी खान याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे
तल्हा खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. (NIA raids in Kondhwa area of pune) तल्हा खान याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तसेच घराची झाडाझडती घेतल्यानंतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे. सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीकी खत्री यांना (जुलै 2020)मध्ये एनआयएने अटक केली होती. (NIA Raids in Kondhwa) तल्हा खान हा नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचं एनआयएला तपासात आढळून आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
चौघांना अटक करण्यात आली