पुणे- डॉक्टर दिनाच्या दिवशी पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फोनवर वाद झाल्यानंतर नवविवाहीत डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली. निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या कारणामुळे पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, भावाने दिली ही माहिती काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. यातील अंकिता ही बीएएमएच आहे. तर निखिल बीएएमएस आहे. वानवडीतील आझादनगर परिसरात हे दोघेही राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. बुधवारी काम संपल्यानंतर निखिल घरी येत असताना दोघे फोनवर बोलत होते. यादरम्यान त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या अंकिताने फोन ठेवून दिला. परंतु निखिल जेव्हा घरी आला तेव्हा त्याला अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या निखिलने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Doctor Couple Suicide : पुण्यात नवविवाहीत डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या हेही वाचा -Ashadhi Ekadashi 2021 : नाथांच्या पालखीचे पैठणहून प्रस्थान, 19 जुलैला एसटीतून जाणार पंढरपूरला