पुणे - वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हायरसमध्ये तीन नवे म्युटेशन (Omicron New Mutations) आढळले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये (NEERI) सुरू असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये (Genome sequencing) हा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यानंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ओमायक्रॉनचे हे नवे म्युटेशन फारसे धोकादायक नाहीत, त्यामुळे चिंता नको, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave) यांनी दिली.
माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे - ओमायक्रॉनचे तीन नवे म्युटेशन -
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन (Omicron Three Mutations) आढळून आले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये (NEERI) सुरू असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये (Genome sequencing) हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ओमायक्रॉनचे म्युटेशन किती घातक आहेत, या संदर्भात निरीतील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. यामध्ये बी.१.१.५२९, बीए १ आणि बीए २ अशी या व्हेरियंटची नावे आहेत.