पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे आता प्रवास करताना बस मार्ग क्रमांकासोबतच प्रत्येक मागाला एक विशिष्ट रंग निश्चित करण्यात आला आहे. ज्यामुळे बसचा मार्ग क्रमांक व सोबत ठराविक रंग यामुळे प्रवास अधिक सोपा होणार आहे. पुणे महानगरातील सर्व मार्गाचे विभाजन प्रत्येक मार्गानुसार ठराविक रंगामध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही सेवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्यूआर (QR) कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला आपापल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
पूणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप या क्यूआर कोडमुळे मार्ग क्रमांक व त्याचा निश्चित रंग यासोबतच त्या बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा व त्या मार्गावरील सर्व बसथाबे याविषयीची देखील माहिती अगदी सहज प्राप्त होणार आहे. हे क्यूआर कोड बसच्या आतील बाजूस, बाहेरील बाजूस. प्रत्येक बसथांबा व प्रत्येक बस डेपो याठिकाणी उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव! अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे उजळणार
यासोबतच बसच्या चारही बाजूनी मार्ग क्रमांक व त्याचा विशिष्ट रंग असेल. ज्यामुळे बस ओळखणे हे प्रवाशांसाठी सोपे होणार आहे. मागील काळात फक्त बस क्रमांकावरून चाललेला संपूर्ण पुणे महानगरातील प्रवास आता इतका परिपूर्ण माहिती प्रदान करणारा व सोपा असेल ज्यामुळे अगदी कोणत्याही मार्गावर पहिल्यांदा प्रवास करणारा प्रवासीदेखील निश्चित होऊन प्रवास करू शकेल. ही करीष्मा सेवा 90 दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. याला अधिक सोपे करण्याच्या दृष्टीने प्रवाशांचे अभिप्राय महत्त्वाचे असून यासाठी टोल फ्री नंबर व सामाजिक प्रसार माध्यमांवरील अधिकृत स्थळ याविषयीची देखील माहिती प्रवाशांना याच क्यूआर कोडमुळे उपलब्ध होणार आहे. प्राप्त झालेले व बदल करण्यायोग्य जे अभिप्राय असतील त्यानुसार आवश्यक ते बदल करून ही सेवा पुढील काळासाठी कार्यान्वित करणार असल्याची माहिती पूणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांनी दिली.
हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव २०२० LIVE : प्रभू श्रीरामांची शोभायात्रा अयोध्येत दाखल, मुख्यमंत्री योगींनी घेतले रामलल्लाचे दर्शन
विशेष म्हणजे, याच सेवेच्या माध्यमातून प्रमुख बस थांबे यांना जोडले गेलेले शहरातील सर्व प्रमुख मार्ग त्याचे मार्ग क्रमांक, विशिष्ट रंग त्यावरील धावणाऱ्या बसचा थांबा ही संपूर्ण सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.