महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वीरमरण आलेल्यांना 'कंस'वधाची उपमा देणाऱ्या भाजपला पाकिस्तानचा कसाब 'श्रीकृष्ण' वाटतो का ?'

दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारून माझे सुतक संपवले' असे वादग्रस्त विधान केले. साध्वीच्या या विधानावर प्रचंड टीका होत आहे. साध्वीच्या वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Apr 19, 2019, 7:26 PM IST

पुणे- साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दहशतवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारून माझे सुतक संपवले' असे वादग्रस्त विधान केले. साध्वीच्या या विधानावर प्रचंड टीका होत आहे. साध्वीच्या वक्तव्याविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी शहिदांना 'कंस'वधाची उपमा देणाऱ्या भाजपला पाकिस्तानचा कसाब 'श्रीकृष्ण' वाटतो का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याने भाजपचा विकृत, घाणेरडा आणि हिंसक चेहरा समोर आला आहे. यांना कुणाचेही देणेघेणे नाही. सत्तेसाठी नीच पातळीला जायची भाजपवाल्यांची मनोवृत्ती आहे, ती आज साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उघडी केली. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शहिदांना कंसवधाची उपमा दिली आहे. मग पाकिस्तानचा कसाब भाजपला श्रीकृष्ण वाटतो का ? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


साध्वी प्रज्ञासिंह या भाजपकडून भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. बुधवारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी त्यांना अटकही झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details