पुणे -आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या निषेधार्थ मोदी महागाई बाजार आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालेभाज्या, फळे, पुस्तके आणि मासळी आणण्यात आली होती. हे सर्व साहित्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या स्टॉलवरून आण्याण्यात आले होते आणि ते परत कार्यकर्ते घेऊन जाऊन विकणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केले.
महागाई आंदोलनातील पालेभाज्या कार्यकर्त्यांच्या स्टॉलवरील, त्या परत विकल्या जाणार - प्रदीप देशमुख - राष्ट्रवादी महागाई आंदोलन पुणे
सर्व साहित्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या स्टॉलवरून आण्याण्यात आले होते आणि ते परत कार्यकर्ते घेऊन जाऊन विकणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केले.
आज महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रसच्या वतीने जे पालेभाज्या आणण्यात आल्या, त्याचे काय होणार, असे विचारले जात असताना हे सर्व साहित्य कार्यकर्त्यांच्या स्टॉलमधून आणण्यात आल्याने ते परत विकले जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. आंदोलनात मोठ्या प्रमाणात सर्व पालेभाज्यांना हात लागल्याने ते विकने कितपत योग्य आहे, हा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीकडून सर्वात महाग चंपा पापलेट मासा विक्रीसाठी -वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावर मोदी महागाई बाजार पेठ भरवत आंदोलन करण्यात आले. पुस्तके, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, मासळी विक्रीसाठी या बाजारात ठेवण्यात आले होते. या बाजारात राष्ट्रवादीकडून सर्वात महाग चंपा पापलेट मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोदी सरकारच्या वतीने अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे. या वाढीच्या निषेधार्थ आज आम्ही मोदी महागाई बाजार पेठ उभी केली असून, मोदी सरकारचा या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहे, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा -Firing on Merchant in Pune : पुण्यातील फॅशनस्ट्रिट परिसरात गोळीबार, व्यापारी जखमी