महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra TET Scam :...त्यामुळे आमदार अब्दुल सत्तारांच शिक्षणमंत्री करा; राष्ट्रवादीचे उपहासात्मक आंदोलन - अब्दुल सत्तारांच शिक्षणमंत्री करा

आता येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार ( Former Minister Abdul Sattar ) यांना शिक्षणमंत्री करा, म्हणजे कुटुंब वत्सल माणसाला शिक्षणमंत्री केल्याचा आनंद होईल, असे सांगत उपासात्मक आंदोलन करण्यात आले. पुण्यातील राष्ट्रवादीच्या ( NCP Agitation Pune ) कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. ईडीच्या भीतीमुळे अनेक लोक पक्षांतर केले आहे. हे सरकार गद्दार आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

NCP Agitation Pune
NCP Agitation Pune

By

Published : Aug 8, 2022, 4:12 PM IST

Updated : Aug 8, 2022, 4:48 PM IST

पुणे -राज्यात झालेल्या टीईटी घोटाळ्यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार ( Former Minister Abdul Sattar ) यांच्या मुलींची सुद्धा नाव होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करा म्हणजे कुटुंब वत्सल माणसाला शिक्षण मंत्री केल्याचा आनंद होईल, असे म्हणत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( NCP Agitation Pune ) कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

आढावा घेताना प्रतिनिधी

ईडीच्या भीतीपोटी अनेक आमदार भाजपामध्ये सामील होत आहे. त्यामुळे हे सरकार गद्दाराचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते. आपल्याच घराचा उद्धार करणार, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका कारण ते ईडीच्या वाशिंग मशीनमध्ये धुवून निघालेले आहेत आणि चांगले कुटुंब वत्सल आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींचे परीक्षा न देता पात्र केले आणि आपल्याच संस्थेवर नोकरी दिली, असे शिक्षण मंत्री जर महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्र आणखी पुढे जाईल, अशी टीका प्रदीप देशमुख यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा -TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

Last Updated : Aug 8, 2022, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details