पुणे- पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. भोसले यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. भोसले यांच्यासह ईडीने चौघांना अटक केली आहे.
११ मार्चपर्यंत कोठडी-
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक केली आहे. भोसले येरवडा कारागृहात होते. आता ईडीने त्यांना अटक केली आहे. तसेच भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सूर्याजी जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ चीफ अकाउंटंट शैलेश भोसले या चौघांनाही ईडीने अटक केली. त्यांना 11 मार्चपर्यंत ईडीने कोठडी सुनावण्यात आली आहे.