महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीचे बिर्याणी आंदोलन - पिंपरी-चिंचवड

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आणि स्नेहभोजन केले. मात्र जनतेच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेच्या पायऱ्यांवर बिर्याणी आंदोलन केले.

बिर्याणी आंदोलन

By

Published : Sep 5, 2019, 5:47 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन केले होते. त्यावेळी मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांसह अनेक जण उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचे बिर्याणी आंदोलन

हेही वाचा - पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची जल्लोषात प्राणप्रतिष्ठापना

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी स्नेह भोजनाकरिता जेवढा वेळ दिला तेवढाच शहराच्या प्रश्नांकरिता देणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसल नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले, परंतु त्यांनी चक्क पोलीस बंदोबस्त ठेवत निमंत्रण नाकारले. त्यामुळे पातेल्यात बिर्याणी आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्य द्वाराच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत आयुक्तांचा निषेध केला. बिर्याणीचे स्नेहभोजन करून एका अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी आयुक्त हर्डीकर यांच्या नावाचे बिर्याणीचे ताट वेगळे ठेवले होते.

महापालिकेचे आयुक्त हे सर्व नागरिकांचे आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. मात्र हर्डीकर हे भाजपमय झाल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे, असे नगरसेवक दत्ता साने म्हणाले. यावेळी नगरसेवक दत्ता साने, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details