पिंपरी-चिंचवड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेत भाजपा, मोदी सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकासआघाडीच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून, भाजपा नेत्यांकडून जोरादर टीका टिप्पणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देखील शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत वक्तव्यं केलं.
पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे जे आघाडीचं सरकार झालं. ते सरकार बनवण्यामध्ये आमच्या काही सहकाऱ्यांचा हात होता, त्यात माझाही किंचित होता. माझाही त्यात सहभा होता. मी ज्यावेळी सगळ्या आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत नेतृत्व कुणी करायचं, यासंबंधी दोन-तीन नावे आमच्याकडे आलेली होती. उद्धव ठाकरे ही बाब मान्य करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले होते. शेवटी विचारलं काय करायचं? कुणाला करायचं? उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी वर केला आणि सांगितलं हेच होतील. त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती. त्यांना अक्षरशा सक्तीने मी हात वर करायला लावला.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
- बऱ्याच वर्षातून मी पिंपरीला आलो आहे.
- पिंपरीतील मताचा विक्रम करुन लोकांनी मला संसदेत पाठवलं, पण आता येणं होत नाही.
- देशाची व राज्याची परिस्थिती वेगळी आहे, केंद्रात ज्याचं सरकार आहे त्यांना त्याच भान नाही, पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. केंद्र सांगते आंतरराष्ट्रीय बाजार वाढत आहे, त्यामुळे दर वाढ होते. पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचे साधन आहे.
- मनमोहन सरकारने पेट्रोल डिझेलबाबत वेगळी भूमिका घेतली होती.
- मात्र भाजप सरकार आता दर वाढ करून सामान्य माणसांना धक्का देत आहेत.
- विजेचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकार भूमिका घेत आहे,पण त्यासाठी कोळसा दर कमी करावेत, अशी भूमिका मांडली पण महाराष्ट्र सरकारकडे तीन हजार कोटी थकबाकी आहे त्यामुळे हे होऊ शकत नाही, असे सांगण्यात आलं. कोळसा किंमत द्यायला उशीर झाला म्हणून आरोप करतात तर जीएसटी रक्कम महाराष्ट्रला केंद्राकडून ३५ हजार कोटी थकवले आहेत. महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करणं योग्य नाही मात्र ते घडत आहे.
- मी ५४ वर्ष राजकारण केलं. अनेक सरकार बघितले, मात्र राज्य सरकार प्रश्नाबाबत केंद्राचा दृष्टीकोन सहानभूतीचा असायचा.
- देशात यंत्रणेचा गैरवापर केला जातोय. सीबीआय, ईडीचा गैरवापर केला जातो. सीबीआयला राज्यसरकारची परवानगी घेतली जायची,पण आता महाराष्ट्रात सीबीआय सत्तेचा गैरवापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
- गृहमंत्र्यांवर आरोप केले. अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून बाजारातून पैसे गोळा करण्याचे आदेश दिले, पण मी सांगितलें नाही, पण काही अधिकाऱ्यांनी पैसे गोळा केले का ? याची चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू होईपर्यंत सत्तेवर थांबता येणार नाही. ज्या आयुक्तांनी तक्रार केली त्याच्यावर रोज आरोप होत आहेत, मात्र ते गायब झाले याचा पत्ता लागत नाही. केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्राने काहीच पाऊल टाकल्याचे दिसत नाही.
- ईडी, सीबीआय चा गैरवापर केला जातो, जिथं भाजपची सत्ता नाही तिकडे या यंत्रणा वापरल्या जातात.
- ncb यंत्रणा ही नवाब मलिक याच्या जावईला काही महिने तुरुंगात ठेवलं, मलिक ncp प्रवक्ते आहेत ते केंद्र सरकारवर टीका करतात त्यांना काही करता येत नाही म्हणून त्याच्या जावयावर कारवाई केली, मात्र कोर्टने ज्यामध्ये कारवाई केली ती म्हणजे गांजा सापडला. हा गांजा नव्हता ती वनस्पती म्हणजे गांजा नव्हता, तरी त्यांना तुरुंगात ठेवलं. मात्र त्यांना जामीन झाला.
काही लोक या कारवाईच समर्थन करण्यासाठी पुढे येत आहेत. यात भाजपचे लोक खुलासा करायला येतात. माजी मुख्यमंत्री येतात, भाजप अध्यक्ष येतात. या सगळ्या कारवाईमध्ये भाजप समर्थन करायला पुढे येतात. हे सरकार टिकणार नाही काही लोक सांगत होते मी येणारच मात्र ते जमत नाही म्हटल्यावर आशा प्रकारे समर्थन करत आहेत, महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत
- एकनाथ खडसे भाजपमध्ये अनेक पद घेतली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर खडसे यांच्यावरही कारवाई सुरू झाल्या. त्याच्या नातेवाईकावर कारवाई केली जात आहे.
- काहीही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचा होत, माझाही सरकार बनवण्यात किंचित हात होता, दोन तीन नाव होती त्यात उद्धव ठाकरे यांचा हात वर केला. हे मुख्यमंत्री होतील असे सांगितले. त्याचा हात वर करण्याची इच्छा नव्हती. यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्याच्याकडे आमदार, खासदार जास्त आहेत त्यामुळे माझ्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाना मुख्यमंत्री करावं असं वाटलं आणि सगळ्यांनी सहमती दिली. त्यामुळे फडणवीस यांनी अस काही बोलू नये
- प्रत्येक मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असते,मात्र निर्णय घेणारा माणूस एका ठिकाणी बसून निर्णय घेणारा हवा, ते आल्यानंतर राज्यात अनेक संकट आली. त्यामुळे ते बाहेर फिरत नाही असा आरोप करण योग्य नाही.
- कोरोना सारख संकट आलं त्यात महाराष्ट्रातील जनतेला बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलं, राजेश टोपे यांनीही चांगलं काम केलं.
- माझ्या कुटूंबीयांच्या घरी चौकशी केली. अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी छापे मारले. छापे एक दोन दिवस होते मात्र पाच दिवस छापे सुरू होते. १४-१५ लोक त्याच्या घरी. ते मध्यमवर्गीय आहेत. पाच दिवस एखाद्याच्या घरी चौकशी केली काम संपल्यावर पाहुणचार घेण्यासाठी थांबू नये.चौकशी माझीही केली तरी हरकत नाही पण एवढे दिवस.
-मुख्यमंत्री पद किंवा माजी मुख्यमंत्री पद ही एक संस्था असते त्याच भान ठेवलं पाहिजे पण ते मुख्यमंत्री असल्याचं बोलत आहेत, मी परत येणार असं म्हणत आहेत.
- महाराष्ट्राचा बंगाल म्हणजे काय, मोठं राज्य आहे. आपण बंगालच नाव राष्ट्रगीतात घेतो, बंगालच स्वतंत्र लढ्यात योगदान जास्त आहे, महाराष्ट्राचा योगदान जास्त आहे, बंगाल महाराष्ट्र जवळचे संबंध आहे. बंगाली भाषा मराठी भाषा जवळचे संबंध आहेत.
- किरीट सोमय्या प्रसिद्धीसाठी करत आहेत, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही.