पुणे- राहुल बजाज आणि माझा मैत्रीचा ओलावा होता. माझा आणि त्यांचा दोन पिढ्यांचा संबंध होता. त्यांची आठवण आमच्या मनात कायम राहील., अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल बजाज यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या ( Sharad Pawar over Rahul Bajaj death ) आहेत. राहुल बजाज आणि शरद पवार यांची ( Rahul Bajaj Sharad Pawar Friendship ) मैत्री किती खास होती हे साऱ्यांनाच ज्ञात आहे.
उद्योगपती राहुल बजाज यांचे आज ( 12 फेब्रुवारी ) दुपारी 2.30 वाजता पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बोलताना शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी अनेक आठवणींनादेखील उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी मित्राच्या विविध गुणांच्या आठवणी सांगितल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ( NCP president Sharad Pawar ) म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्यांनंतर उद्योग उभारणीत अनेकांचे योगदान आहे. अनेक पिढ्यांनी आधुनिक दृष्टिकोन ठेवून उद्योगाचा पाया घातला. त्यात मुख्य नाव म्हणजे राहुल बजाज अशा शब्दात त्यांनी राहुल बजाज यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा-Rahul Bajaj : देशातील सर्वात तरुण 'सीईओ' ते पद्मभूषण, थक्क करणारा राहुल बजाज यांचा प्रवास
मुंबईत उद्योग न करता पिंपरीत उद्योगाची सुरुवात - शरद पवार
औद्योगीक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये राहुल बजाज यांनी आपला ठसा उमटविला. त्यांनी पुण्यातून त्यांच्या उद्योगाची सुरूवात केली. सगळे मुंबईत बसून उद्योग करतात. पण त्यांनी त्याला मोडत घालत पिंपरी येथून आपल्या उद्योगाची सुरवात करत यशस्वी झाले. त्यांनी राज्य सरकारच्या मदतीने मोठ काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल बजाज यांच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून दिली आहे.