पुणे -अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली ( Ketaki Chitale Controversy Post On Sharad Pawar ) आहे. त्यानंतर तिच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ( Rupali Patil Thombare Criticized Ketaki Chitale ) आहे.
'कोण केतकी चितळे, तीच वय काय?' -'ईटिव्ही भारत'शी बोलताना रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, कोण केतकी चितळे, तीच वय काय? ती तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला, अशी भाषा वापरते. एकत्र ही मनोरुग्णाने गंजाडी अभिनेत्री आहे. जातीय तेढ वाढवण्याचा जो प्रयत्न आहे. तो कोणत्या लेव्हलपासून कुठल्या लेव्हल पर्यंत सतत बिंबवण्याचे हे जे पोरखेळ चालू आहेत ना, त्वरित बंद झाले पाहिजे.
'तिच्यावर मानसिकतेचे उपचार सुरू' - मुळात केतकीच तेवढे वय सुद्धा नाही की तिने शरद पवारांवर वक्तव्य करावे. केतकी चितळे आजारी असून, तिच्यावर मानसिकतेचे उपचार सुरू आहे. तिच्या आईवडिलांचे दुर्देव म्हणावे लागेल की तिला त्यांनी संस्कार दिलेले नाहीत. तिने पोस्ट करताना कुणी तरी वकील नितीन भावे याच नाव खाली लिहिले आहे. मला नाही वाटत कुणी नितीन भावे वगैरे असतील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.