महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांकडून क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी; म्हणाले, या विद्यापीठामुळे.. - स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी न्यूज पुणे

पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या क्रीडा विद्यापीठाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी केली. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडाराज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

Priority : Normal
Priority : Normal

By

Published : Jun 26, 2021, 1:16 PM IST

मुंबई - महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करायचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट आहे. या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळेल तसेच जुन्या खेळाडूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी शरद पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडी येथे जाऊन क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते.

बालेवाडीत होणार विद्यापीठ -

पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या क्रीडा विद्यापीठाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी केली. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडाराज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

पवारांनी केली पाहणी -

यावेळी बोलताना पवारांनी क्रीडा विद्यापीठाच्या संकल्पनेबाबत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेने क्रीडा विद्यापीठाला एकमताने मंजुरी दिली ही चांगली बाब आहे. बालेवाडीच्या माध्यमातून या विद्यापीठाला सुंदर परिसर मिळेल, स्पोर्ट सायन्स स्पोर्ट टेक्नॉलॉजी, स्पोर्ट कोचिंग अँड ट्रेनिंग याचे अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू केले जात आहेत, 400 कोटी रुपये या विद्यापीठासाठी मंजूर केलेले आहेत, या कामाला गती देण्याची भूमिका पाहता लवकरच स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे स्वप्न पूर्ण होईल, यात काही शंका नाही असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवारांकडून क्रीडा विद्यापीठाच्या जागेची पाहणी..

चांगला निर्णय -

बीसीसीआयचा अध्यक्ष असताना आयपीएल सुरू केले. या माध्यमातून जुन्या खेळाडूंना देखील संधी मिळाली तसेच या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक संधी जुन्या खेळाडूंना नवे दालन उघडे होईल. तसेच सीएसआर मधून क्रीडा विभागाला खेळाडूंना मदत कशी होईल, यासाठी क्रीडा मंत्र्यांनी उद्योग जगताशी बैठक घेऊन प्रयत्न करावेत, असे सांगितले असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यामागचा हेतू ..

यावेळी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी या विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतला. राज्याची क्रीडाविषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन तसेच नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात आणि तरुण वर्गाला क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यामागचा हेतू असल्याचं क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details