पुणे - राज्यात वेदांता प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पुण्यात आज गुरुवारी राष्ट्रवादीकडून मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्यात आले. यात राज्य सरकारविरोधात जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar criticized Shinde government Vedanta project ) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होतं. हे दुर्दैवी आहे. वेदांत प्रकल्प आता महाराष्ट्रात येणं शक्य नाही. ठाकरे सरकार याचं खापर फोडणं अयोग्य आहे. मंत्री आता सांगतायत की, आम्ही यापेक्षा मोठा प्रकल्प आणू. हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
मोदी शहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना'वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापले आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, हा प्रकल्प जर आत्ता गुजरातला गेला आहे. तर मग कशाला चर्चा करायची ? हा प्रकल्प तळेगांव येथे येणार होता. यावर त्याची चर्चा देखील झाली होती. राज्य सरकारने यासाठी आवश्यक पूर्तता देखील केली होती. पण आज हा प्रकल्प राज्यातून गेला आहे, त्यामुळे यावर चर्चा करू नये. असं यावेळी पवार ( NCP chief Sharad Pawar criticized Shinde government over Vedanta project pune ) म्हणाले.