पुणे - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Arrest by ED) यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. नवाब मलिक यांना चौकशीसाठी सकाळीच ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले होते. नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक (NCP Protest in Pune) झाले आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांच्यावतीने 'रिहा करो रिहा करो नवाब मलिक को रिहा करो' अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
प्रतिनिधींनी आंदोलकांसोबत साधलेला संवाद ईडीची झाली बिडी -
केंद्र सरकार हे सातत्याने ईडीचा गैरवापर करत आहे. अनेक मंत्र्यांना बेकायदेशीरपणे ईडीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नवाब मलिक हे मंत्री असताना कुठल्याही प्रकारचा समन्स न देता ईडी कार्यालयात चौकशीसाठी त्यांना नेण्यात आले व त्यानंतर अटक करण्यात आली. हे अत्यंत निषेधार्थ असून याने लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजप विरोधात बोलले की लगेच ईडी आणि सीबीआय मागे लावले जात आहेत. म्हणून ईडीची बिडी झाली असून, या राज्यातील जनता ती बिडी फुकणार आहे, अशी टीका यावेळी आंदोलकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांच्यावतीने मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नवाब मलिक यांना ईडीकडून अटक -
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली (Nawab Malik arrested by ED) आहे. आज पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी आपल्या कार्यालयात घेऊन आले. अखेर चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.