पुणे- पुण्यात भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना चोप दिला. या प्रकरणी आंबेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, माझ्या कवितेतील जे काही चुकीच्या ओळी होत्या त्या डिलिट केल्या आणि त्यानंतर माफी देखील मागितली. असे असताना देखील मला मारहाण करण्यात आली. मी दररोज चांगल्या भाषेत शरद पवार यांच्यावर टिप्पणी करणार आहे. माझे खुले आवाहन आहे की, त्यांनी मला रोखून दाखवावे, असे आवाहन आंबेकर ( BJP Leader Vinayak Ambekar news ) यांनी केले.
विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून चोप हेही वाचा -महागाईच्या काळात माणूसकीचे दर्शन.. पुण्यातील तरुण पोलीस, अपंगांना देतोय मोफत रिक्षा सेवा
मी तक्रार दाखल केली मी माझ्या फेसबुक अकाऊंटवरून काल एक कविता पोस्ट केली होती. यात कोणत्याही व्यक्तीचे नाव नव्हते. कोणत्याही प्रकारचे अपशब्द नव्हते. तरीही माझ्या कवितेतील काही ओळी या समाजातील काही व्यक्तींना खटकले आहे, असे माझ्या पक्षाने मला सांगितले आणि त्यानंतर मी त्या चुकीच्या ओळी डिलिट करून जाहीर माफी देखील मागितली. पण, तरीही आज राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे माझ्या कार्यलयात येऊन मला शिवीगाळ करून त्यांनी मला मारहाण केली. याबाबत मी फडगेट पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आमच्या नेत्यांना सांगितल्यानंतर आणि पक्षातील नेत्यांनी मला सांगितल्यानंतर मी लगेच पोस्ट डिलिट केली आणि माफी देखील मागितली. तरीही अंकुश काकडे यांनी स्वतः खाली थांबून कार्यकर्त्यांना माझ्या कार्यालयात पाठवून त्यांना मला मारहाण करायला सांगितले. या मागे मास्टर माईंड हे अंकुश काकडे आहे, असे देखील यावेळी आंबेकर यांनी म्हणाले.
अभिनेत्री केतकी चितळे ( Actress Ketaki Chitale ) हिने शुक्रवारी (दि. 13 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल होती. पुण्यातही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनायक आंबेकर ( BJP Leader Vinayak Ambekar ) यांनीही दोन दिवसांपूर्वी पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शनिवारी (दि. 14 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना चोप दिला.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर तडक शुक्रवार पेठेतील आंबेकर यांच्या कार्यालयांमध्ये आंबेकरला यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. यापुढे जो कोणी अशा प्रकारे शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट करेल त्याला अशाच प्रकारची वागणूक दिली जाईल, याची गंभीर दखल पवार विरोधकांनी घ्यावी, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.
हेही वाचा -Ketaki Chitale Controversy : 'केतकीला चोप देणार, तेव्हाच तिची अक्कल ठिकाण्यावर येईल'