महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीबीचा पंच किरण गोसावीच्या महिला अस्टिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक - किरण गोसावी पुणे पोलीस लुकआऊट नोटीस

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

एनसीबीचा पंच किरण गोसावी
एनसीबीचा पंच किरण गोसावी

By

Published : Oct 18, 2021, 3:43 PM IST

Updated : Oct 18, 2021, 4:02 PM IST

पुणे- फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असे या महिला असिस्टंटचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. आर्यन खानसह इतर जणांना अटक केलेल्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.

2018 मधे किरण गोसावी आणि महिला असिस्टंट शेरबाने कुरेशी या दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कुरेशीला मुंबईतून अटक केली आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या कुरेशीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संबंधित वाचा-आर्यन खान ड्रग केस प्रकरणातील एनसीबीचा मुख्य साक्षीदार एका गुन्ह्यात फरारी

गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा

फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितले. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दाखल केली होती.

संबंधित वाचा-किरणला अटक करा, नाहीतर गोळ्या घाला, आमचा संबंध नाही - प्रकाश गोसावी


काय आहे नेमके प्रकरण?

2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.

संबंधित वाचा-आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीचा मुख्य साक्षीदार किरण गोसावी कोण? वाचा..

किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गोसावी सापडत नसल्याने त्याला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले होते.

के. पी. गोसावी नेमका कोण?

व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.

ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावी याच्यावर आरोप करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

Last Updated : Oct 18, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details