पुणे - सध्या कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक कलाकारांनी गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन केलंय. आपल्या परीने हे कलाकार लोकगिते, भजन, भारुड, पोवाडे, कविता सादर करुन या मोहिमेला हातभार लावत आहेत. आत्ता कोरोनाबाबत पुण्यातील धनकवडी भागातील नजीर सय्यद या युवकाने चक्क मराठीतच रॅप साँग बनवलंय.
पुण्यातील नजीर सय्यद या युवकाने चक्क मराठीतच बनवलं कोरोनावर रॅप सॉंग... - पुण्यातील नजीर सय्यद या युवकाने चक्क मराठीतच बनवलं कोरोनावर रॅप सॉंग...
कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत अनेक पातळीवर प्रबोधन होत आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृती करणम्यात येत आहे. पुण्यातील नजीर सय्यद या युवकाने चक्क मराठीतच बनवलंय कोरोनावर रॅप सॉंग...
नजीर सय्यद
जनहितासाठी काळजी घ्या.. घरीच रहा.. या आशयाचं त्याचं रॅपर गीत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. नजीर सय्यद हा गेल्या 3 ते 4 वर्षपासून रॅपर सॉंग बनवतं आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशात प्रत्येक जण या विषयी जनजागृती करत आहे. पोलीसही गाण्यांच्या माध्यमातून नागरिकांना घरीच रहा सुरक्षित रहा, अशा प्रकारे आवाहन करत आहे. अशातच नजीर सय्यदने तयार केलेले या रॅपर साँग सध्या सोशल मिडियावर लोकप्रिय होत आहे.
Last Updated : Apr 11, 2020, 10:04 PM IST