पुणे : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना प्राध्यापक हरी नरके यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाचनाशी काय संबंध आहे अशा आशयाची पोस्ट केली( Hari Narke controversial post abdul kalam ) आहे. यावर आत्ता विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि मूल निवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी नरके यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख संपूर्ण जगात आहे. ज्या व्यक्तीचा आदर संपूर्ण जग करतो ज्यांनी भारत देशासाठी मोठा योगदान दिले, अशा महान व्यक्तीबद्दल चुकीचे विधान करणे हे गैर कृत्य आहे. याबाबत हरी नरके यांनी समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे व राज्य सरकारने त्यांच्या गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात आली आहोत.