महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP Agitation In Pune : महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; चूल मांडत केले आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

गेल्या 3 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ केली आहे. तसेच, घरगुती गॅसमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. (NCP Agitation In Pune) या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक होत पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ चूल मांडत आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी (Go Back Modi) अशा घोषणा दिल्या आहेत.

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

By

Published : Mar 24, 2022, 12:52 PM IST

पुणे - केंद्र सरकारने गेल्या 3 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ केली आहे. तसेच, घरगुती गॅसमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक होत पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ चूल मांडत आंदोलन केले आहे. (NCP Movement In Pune) यावेळी कार्यकर्त्यांनी (Go Back) मोदी अशा घोषणा दिल्या आहेत.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

घरगुती गॅसचे दर वाढले - देशात 5 राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा जीवनावश्यक वस्तूंचे दर हे नियंत्रणात ठेवण्यात आले होते. पण जसे निवडणुका संपल्या तसे मोदी सरकारच्यावतीने पेट्रोल डिझेल तसेच घरगुती गॅसचे दर वाढवण्यात आलेले आहेत. जेव्हापासून देशात मोदी सरकार आले आहे. तेव्हापासून सातत्याने पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमतीत वाढ होताना दिसून येत आहे.

एकेकाळी साडेतीनशे रुपयाला मिळणारा गॅस आज हजार रुपयाच्या किमतीत मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या सरकारने लवकरात लवकर घरगुती गॅस तसेच पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

काल ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. देशात विविध विषयांवरून वाद निर्माण करून आदानी आणि अंबानी यांना कॉन्ट्रॅक्ट देण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे अशी टीकाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

हेही वाचा -Pune Minor Girl Rape : पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details