महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 30, 2022, 12:04 PM IST

ETV Bharat / city

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 142 वी पासिंग आऊट परेड पुण्यात पार पडली

पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 142 वी पासिंग आऊट परेड पार पडली. द्वितीय लेफ्टनंट अरुण खेतरपाल मैदानावर हा कार्यक्रम झाला. ( National Defence Academy ) अकादमीतील अंतिम क्षण क्वार्टर डेकच्या मार्चपास्टने चिन्हांकित केले गेले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 142 वी पासिंग आऊट परेड पुण्यात पार पडली
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 142 वी पासिंग आऊट परेड पुण्यात पार पडली

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची 142 वी पासिंग आऊट परेड सोमवारी पुण्यात पार पडली. द्वितीय लेफ्टनंट अरुण खेतरपाल मैदानावर हा कार्यक्रम झाला. ( National Defence Academy ) दरम्यान, एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी परेडचा आढावा घेतला. अकादमीतील अंतिम क्षण क्वार्टर डेकच्या मार्चपास्टने चिन्हांकित केले गेले.

व्हिडीओ


काल हबीबुल्लाह सभागृहात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४२ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी 234 कॅडेट्सना जेएनयूची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेतील 41 कॅडेट, संगणक विज्ञान शाखेतील 106 कॅडेट आणि कला शाखेतील 68 कॅडेट्सचा समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यान परदेशातील १९ कॅडेट्सना पदव्या प्रदान करण्यात आल्या. याशिवाय, नौदल आणि हवाई दलातील 106 कॅडेट्सचा समावेश असलेल्या बी टेक स्ट्रीमलाही 'तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र' मिळाले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व्हाइस अॅडमिरल अजय कोचर यांनी केले.

स्प्रिंग टर्म - (2022)चा शैक्षणिक अहवाल सादर करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले. भारतीय सशस्त्र दलाच्या या प्रतिष्ठित 'ट्रो सर्व्हिसेस' प्रशिक्षण संस्थेत सहभागी होण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व पालकांचे त्यांनी अभिनंदन केले आणि आभार मानले.

हेही वाचा -सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज; गाड्या पाठलाग करत असल्याचे आले समोर

ABOUT THE AUTHOR

...view details